5 May 2024 4:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

ROX Hi-Tech IPO | श्रीमंत करणार हा IPO! एकदिवसात मिळणार 109 टक्के परतावा, IPO शेअरची प्राइस बँड 80 रुपये

ROX Hi-Tech IPO

ROX Hi-Tech IPO | आरओएक्स हाय-टेक कंपनीचा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आरओएक्स हाय-टेक स्टॉक बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. आरओएक्स हाय-टेक कंपनीचा IPO 7 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.

या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 80 रुपये ते 83 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या IPO साठी एका लॉटमध्ये 1600 शेअर्स ठेवले आहेत. आरओएक्स हाय-टेक ही कंपनी मुख्यतः ग्राहक केंद्रित IT सेवा प्रदान करण्याचे काम करते.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, आरओएक्स हाय-टेक कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरओएक्स हाय-टेक स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 90 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच, हा स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना 109 टक्के नफा मिळवून देऊ शकतो. आरओएक्स हाय-टेक कंपनीचे शेअर्स 173 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

आरओएक्स हाय-टेक कंपनीच्या IPO चा आकार 54.49 कोटी रुपये आहे. 15 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. आणि 16 नोव्हेंबर रोजी ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप झाले नाही, त्यांचे पैसे परत केले जातील. 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. आरओएक्स हाय-टेक ROX कंपनीचे IPO शेअर्स 20 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.

स्वराज शेअर्स अँड सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आरओएक्स हायटेक IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पूर्वा शेअर रेजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ROX हायटेक कंपनीच्या IPO साठी मार्केट मेकर म्हणून शेअर इंडिया सिक्युरिटीज काम करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ROX Hi-Tech IPO for investment 09 November 2023.

हॅशटॅग्स

ROX Hi-Tech IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x