 
						Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 33.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
रिलायन्स पॉवर ही कंपनी आता कर्जमुक्त झाली आहे. म्हणजेच या कंपनीने आपली संपूर्ण थकबाकी परतफेड केली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी जवळ पोहोचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 31.20 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
मागील 4 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2800 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 1.13 रुपयेवरून वाढून 33.10 रुपये किमतीवर पोहचले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 जून 2024 रोजी हा स्टॉक 33.10 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.80 रुपये होती.
रिलायन्स पॉवर कंपनीवर 800 कोटी रुपये कर्ज होते, जे कंपनीने पूर्णपणे फेडले आहे. डिसेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान रिलायन्स पॉवर कंपनीने IDBI बँक, ICICI बँक, Axis बँक आणि DBS यासह अनेक बँकाचे कर्ज परतफेड केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीने अरुणाचल प्रदेशात 1200 मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाचे विकास हक्क THDC ला 128 कोटी रुपयेला विकले होते. याव्यतिरिक्त मार्च 2024 मध्ये या कंपनीने महाराष्ट्रातील 45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प JSW कंपनील 132 कोटी रुपयेला विकला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		