
Reliance Power Share Price | अनिल अंबानींच्या मालकीची रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. एका वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, हा शेअर पुढील काही दिवसात 34 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.38 टक्के वाढीसह 26.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीचा IPO जानेवारी 2008 मध्ये शेअर बाजारात 405 ते 450 रुपये प्रति इक्विटी शेअर किमतीवर लॉन्च करण्यात आला होता. हा स्टॉक BSE इंडेक्सवर 547.80 रुपये आणि NSE इंडेक्सवर 530 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीने लिस्टिंगनंतर आपल्या गुंतवणुकदारांना 3:5 बोनस शेअर्स वाटप केले होते.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. आणि नीचांक किंमत पातळी 11.06 रुपये होती. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने आपल्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स या उपकंपनीचे 1,023 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. यासह रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीच्या दोन उपकंपन्या, कालाई पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि रिलायन्स क्लीनजेन लिमिटेड यांनी कर्ज सेटलमेंट करार केला आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीने महाराष्ट्रातील 45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प JSW रिन्युएबल एनर्जी कंपनीला 132 कोटी रुपये किमतीला विकण्याची घोषणा केली आहे. आणि कालाई पॉवर कंपनीने डिसेंबर 2023 मध्ये अरुणाचल प्रदेशातील प्रस्तावित 1,200 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाचे विकास हक्क THDC इंडिया लिमिटेड कंपनीला 128 कोटी रुपये किमतीला हस्तांतरित केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.