
Reliance Power Share Price | अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 6 टक्के वाढीसह 16.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी समूहाने अनिल अंबानी यांचा कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्प खरेदी करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.
अदानी समूहाने विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड हा पॉवर प्लांट खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. अनिल अंबानींचा विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड पॉवर प्लांट मध्य भारतात 600 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करतो. सध्या ही कंपनी दिवाळखोर प्रक्रियेला सामोरे जात आहे. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के घसरणीसह 15.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीची विदर्भ इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक आहे. विदर्भ इंडस्ट्रीज कंपनीच्या कर्जदात्यानी कर्ज निराकरण प्रक्रिया आयोजित करण्यासाठी SBI कॅप्स्ला सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भ इंडस्ट्रीज कंपनीच्या कर्जदात्यांकडून यापूर्वीच तीन प्रस्ताव देण्यात आले आहेत. आता अदानी समूहाने रिलायन्स पॉवर कंपनीचा भाग असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड कंपनीचे ऊर्जा निर्मिती प्लांट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीने विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड कंपनीच्या कर्जदात्याना 1,260 कोटी रुपयेचे वन टाइम सेटलमेंट ऑफर केली आहे. याशिवाय अहमदाबाद स्थित CFM मालमत्ता पुनर्रचना आणि NARCL ने देखील त्यांच्या बाजूने आपली ऑफर दिली आहे. CFM ची ऑफर 1,260 कोटी रुपयेची असून NARCL ची बोली 1,120 कोटी रुपयेची आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मागील पाच दिवसात 1.62 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 32.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2008 पासून या कंपनीचे स्टॉक 93.26 टक्के कमजोर झाले आहेत. याकाळात शेअरची किंमत 247 रुपयेवरून घसरुन 15 रुपयेवर आली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.