 
						Reliance Share Price | मागील २ महिन्यांत स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. या कालावधीत एफआयआय’ने जोरदार नफा वसुली (NSE: RELIANCE) केली होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणाऱ्या विक्रीमुळे स्टॉक मार्केटमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी सारख्या हेवीवेट शेअर्सची एफआयआय’ने मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने चिंता अधिक वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत मागील 6 आठवड्यात मोठ्या प्रमाणात घसरल्याने कंपनीचे एकूण मार्केट कॅप 5 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 2.17 टक्के वाढून 1,249.45 रुपयांवर पोहोचला होता. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 16,86,810 कोटी रुपये आहे.
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची टार्गेट प्राईस 1,562.5 रुपयांवरून घटवून 1,468 रुपये केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या अलीकडील खराब कामगिरी मागील दोन प्रमुख कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे कमकुवत रिफायनिंग मार्जिन असल्याचे बोरकरेजने म्हटले आहे.
शेअरने 4613% परतावा दिला
मागील ६ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 14.46% घसरला आहे. मागील १ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 4.64% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 63.12% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4613% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 3.53% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		