
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत नवीन अपडेट आली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे बाजार भांडवल 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते. मॉर्गन स्टॅनलीने आपल्या अहवालात असा अंदाज व्यक्त केला आहे की, ऑईल आणि दूरसंचारसह रिटेल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत आणि बाजार भांडवल प्रचंड प्रमाणात वाढू शकते. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
मॉर्गन स्टॅनलीच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 3540 रुपये किमतीवर जाऊ शकतो. दीर्घकालीन दृष्टिकोन पाहता हा स्टॉक 4377 रुपयेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.13 टक्के घसरणीसह 3,126.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
28 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3,161.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑक्टोबर 2023 मध्ये या कंपनीचे शेअर 2,221.05 रुपयेपर्यंत घसरले होते. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लीने 2023-24 ते 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे महसूल संकलन 12 टक्के सरासरी वार्षिक दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने नवीन ऊर्जा, उच्च दूरसंचार शुल्क, रासायनिक व्यवसायातील मार्जिन यासारख्या क्षेत्रातून महसूल कमाई केल्याने कंपनीच्या बाजार भांडवलात लक्षणीय वाढ झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या रिटेल व्यवसायाचा महसूल वाढीचा अंदाज 2025 ते 2027 दरम्यान 1-6 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. टेलिकॉम सेक्टरमधील सुधारित नफ्यामुळे आणि मार्जिनमुळे कंपनीच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळाली आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, रिटेल क्षेत्रातील वाढती मागणी आणि स्टोअर विस्तारामुळे रिलायन्स कंपनीच्या रिटेल व्यवसायात वाढीची शक्यता मजबूत दिसत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.