
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने नुकताच 3000 रुपयेची पातळी ओलांडली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 3024.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मात्र शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 2,997 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 2024 या वर्षात 16 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 3210 रुपये स्पर्श करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे.
जेफरीज इंडिया फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 3140 रुपये निश्चित केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या तेल आणि रासायनिक व्यवसायात जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली आहे. म्हणून तज्ञांना विश्वास आहे की, मार्च तिमाहीत कंपनीचा EBITDA 2 टक्के आणि PAT 1 टक्क्यांनी वाढू शकतो.
इलारा सिक्युरिटीज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर 3,354 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 2024 या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 16.65 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 62.3 आहे. हा स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसाच्या सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.