 
						Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने MSKVY Nineteenth Solar SPV Limited आणि MSKVY ट्वेंटी-सेकंड सोलर SPV लिमिटेड कंपनीचे 100 टक्के इक्विटी शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शेअर्स MSEB सोलर ऍग्रो पॉवर लिमिटेड कंपनीकडून खरेदी केले जाणार आहेत. ( रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 2,887.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत महाराष्ट्रात विविध ठिकाणी 128 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निविदेच्या अटींची पूर्तता करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी MSEB सोलर ऍग्रो पॉवर लिमिटेड कंपनीकडून संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर व्यवहाराची सविस्तर माहिती जाहीर करणार आहे.
ब्रोकरेज फर्म यूबीएसच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 3,400 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. यासोबतच ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर 3210 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर 0.30 टक्के वाढीसह 2909.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3,024.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने या वर्षाच्या अखेरीस पॉवर गिगा कॉम्प्लेक्स सुरू करण्याची योजना आखली आहे.
रिलायन्स कंपनीने हा गीगा कॉम्प्लेक्स जामनगर, गुजरातमध्ये 5,000 एकर क्षेत्रात बांधण्याचे निर्धारित केले आहे. गुजरातमधील जामनगर याठिकाणी फोटोव्होल्टेइक पॅनेल, फ्युएल सेल सिस्टम, ग्रीन हायड्रोजन, एनर्जी स्टोरेज आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी पाच गिगा कॉम्प्लेक्स बांधण्याचे नियोजित आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		