12 December 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना
x

Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा 88 रुपयाचा शेअर तुफान तेजीत येणार? कंपनीकडून मोठी अपडेट आली

Ambuja Cement Share Price

Ambuja Cement Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अंबुजा सिमेंट कंपनीने संघी इंडस्ट्रीज लिमिटेड या आणखी एका कंपनीमधील 2 टक्के भाग भांडवल विकले आहे. या विक्रीमुळे संघी इंडस्ट्रीज कंपनीमधील अंबुजा सिमेंट कंपनीची हिस्सेदारी 62.44 टक्के वरून कमी होऊन 60.44 टक्केवर आली आहे. ( अंबुजा सिमेंट कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये संघी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 88.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी संघी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.36 टक्के घसरणीसह 87.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 596.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अंबुजा सिमेंट कंपनीने संघी इंडस्ट्रीज कंपनीमधील 2 टक्के भाग भांडवल 258.32 कोटी रुपये मूल्यावर विकले आहेत. 14 मार्च ते 21 मार्च दरम्यान अंबुजा सिमेंट कंपनीने संघी इंडस्ट्रीज कंपनीचे 51,66,000 इक्विटी शेअर्स विकले आहेत.

मागील वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये, अंबुजा सिमेंट कंपनीने गुजरात स्थित संघी इंडस्ट्रीज या सिमेंट कंपनीचे 56.74 टक्के भाग भांडवल 5,000 कोटी रुपये मूल्यावर खरेदी केले होते. यासह अंबुजा सिमेंट कंपनीने संघी इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तक गटाचे उर्वरित 57 लाख शेअर्स म्हणजेच 2.23 टक्के भाग भांडवल स्वतंत्रपणे खरेदी केले होते.

यानंतर अंबुजा सिमेंट कंपनीने संघी इंडस्ट्रीज कंपनीचे 26 टक्के भाग भांडवल खुल्या ऑफरद्वारे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. डिसेंबर 2023 मध्ये अंबुजा सिमेंट कंपनीने संघी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खुल्या ऑफर अंतर्गत 114.22 रुपये दरम्यान खरेदी केले होते.

गुजरात स्थित संघी इंडस्ट्रीज ही कंपनी सिमेंट उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी सिंगल लोकेशन सिमेंट आणि क्लिंकर युनिट कंपनी आहे. अंबुजा सिमेंट कंपनीला या अधिग्रहणामध्ये एक कॅप्टिव्ह जेटी आणि पॉवर प्लांटची सुविधा देखील मिळाली आहे. यामुळे अंबुजा सिमेंट कंपनीला महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्याच्या किनारपट्टी भागात वस्तूंची वाहतूक सोप्या पद्धतीने करता येईल. अदानी समूहाने 2022 मध्ये अंबुजा आणि ACC या दोन्ही कंपनीचे अधिग्रहण 10.5 बिलियन डॉलर्समध्ये केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ambuja Cement Share Price NSE Live 26 March 2024.

हॅशटॅग्स

Ambuja Cement Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x