
Reliance Share Price | शुक्रवार, २० डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवार शेअर बाजारातील सर्वच निर्देशांक मजबूत घसरले होते. शेअर बाजार बीएसई सेन्सेक्स १.४९ टक्क्यांनी घसरून ७८,०४१.५९ वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी 50 देखील 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 23587.50 वर बंद झाला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, २० डिसेंबर २०२४ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.99 टक्के घसरून 1,206 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,608.80 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 1,201.50 रुपये होता. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण मार्केट कॅप 16,31,056 कोटी रुपये आहे.
Reliance Industries Share Price – NSE: RELIANCE
स्टॉक मार्केट विश्लेषक नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिली आहे. नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी 1320 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. नुरेश मेराणी यांनी गुंतवणूकदारांना 1220 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 1,206 रुपयांवर ट्रेड करत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4449 टक्के परतावा दिला
मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 5.67% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 4.69% घसरला आहे. मागील ६ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 16.34% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 5.97% घसरला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 52.27% परतावा दिला आहे. YTD आधारावर हा शेअर 6.88% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 4,449% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.