27 July 2024 6:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Responsive Industries Share Price | मालामाल शेअर! दोन दिवसात रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज शेअरने 21% परतावा दिला, आता मल्टिबॅगर परतावा?

Responsive Industries Share Price

Responsive Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये 307 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर स्टॉक मध्ये निंचीत नफा वसुली झाल्याने स्टॉक खाली आला. रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला भारतीय रेल्वेकडून एक मोठे कंत्राट देण्यात आले आहे. हे कॉन्ट्रॅक्ट गरीब रथ ट्रेन प्रकल्पा संबंधित कामासाठी देण्यात आले आहे. कंपनीने अद्याप या ऑर्डरचे मूल्य आणि इतर तपशील जाहीर केले नाहीये.

मात्र याचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किमतीवर पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 301.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीला वंदे भारत ट्रेन आणि गरीब रथ ट्रेन संबंधित काम देण्यात आले आहे. रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज ही सिंथेटिक लेदर बनवणारी कंपनी आहे. वंदे भारत आणि गरीब रथ प्रकल्पासाठी रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनी सिंथेटिक लेदर बनवणार आहे.

वंदे भारत रेल्वे आणि गरीबरथ प्रोजेक्ट भारतातील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे रेल्वे प्रकल्प म्हणून ओळखले जातात. या प्रकलापचे काम मिळणे म्हणजे कंपनीसाठी व्यापार विस्तार करण्याची खूप मोठी संधी चालून आली आहे. याचा फायदा पुढील काळात रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीला होईल.

मागील 6 महिन्यांत रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 145 टक्के परतावा कमावून दिला आहे. रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8 मार्च 2023 रोजी 122.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 307 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील गेल्या 3 वर्षात रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 211 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 39 टक्के परतावा कमावून दिला आहे. रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 101 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Responsive Industries Share Price today on 08 September 2023.

हॅशटॅग्स

Responsive Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x