2 May 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Stocks To Buy | तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 3 डिफेन्स कंपन्यांचे मल्टिबॅगर शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत फायदा होईल

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या भारतात G-20 परिषदेची तयारी सुरू आहे. भारतात विविध देशाचे प्रतिनिधी आणि अध्यक्ष भेटीवर आले आहेत. G-20 परिषदेत विविध देश भारतासोबत आर्थिक आणि संरक्षण करार करण्यास उत्सुक आहे. याचा फायदा भारतातील संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा संरक्षण सामग्री आयात करणारा देश राहिला नसून, आता भारत संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश बनला आहे.

भारतातील विविध डिफेन्स कंपन्या आपले मेड इन इंडिया हत्यार विविध देशात निर्यात करत आहेत. म्हणून शेअर बाजारातील तज्ञ डिफेन्स कंपन्याच्या बाबतीत उत्साही पाहायला मिळत आहे. तज्ञांनी व्हीआयपी इंडस्ट्रीज, पारस डिफेन्स आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

गार्डन रीच शिपबिल्डर्स

शेअर बाजारातील तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी गार्डन रीच शिपबिल्डर्स स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर 870-880 रुपये रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना नुकसान टाळण्यासाठी 820 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 960 रुपये लक्ष किमतीसाठी पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स ही भारत सरकारच्या मालकीची एक मिनीरत्न दर्जा असलेली कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालया अंतर्गत काम करते.

गार्डन रीच शिपबिल्डर्स स्टॉक परतावा

मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 11 टक्के वाढली होती. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 51 टक्के वाढली होती. अवघ्या तीन महिन्यांत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के नफा कमवून दिला होता.

6 महिन्यांत स्टॉकने लोकांना 110 टक्के आणि 12 महिन्यात 160 टक्के परतावा कमावून दिला होता. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 367 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 2.08 टक्के घसरणीसह 888.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पारस डिफेन्स

शेअर बाजारातील तज्ञांनी संरक्षण क्षेत्रातील पारस डिफेन्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक परकी किंमत 842 रुपये होती. तर नीचांक पत्की किंमत 445 रुपये होती. तज्ञांनी या स्टॉकवर 870 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. गुंतवणुक करताना नुकसान टाळण्यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 760 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

पारस डिफेन्स स्टॉक परतावा

मागील एका आठवड्यात पारस डिफेन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8.14 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 27 टक्के, आणि तीन महिन्यांत 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत पारस डिफेन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के आणि एका वर्षात 33 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी पारस डिफेन्स कंपनीचे शेअर्स 2.31 टक्के वाढीसह 816.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

व्हीआयपी इंडस्ट्रीज

शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करून भरघोस कमाई करण्यासाठी व्हीआयपी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 765 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 549 रुपये होती.

तज्ञांनी या कंपनीचे शेअर 700 रुपयेच्या खाली आपल्यावर खरेदी करण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत 777 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के घसरणीसह 693.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks To Buy for investment on 08 September 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x