
RHI Magnesita India Share Price | सध्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा सुरुवात झाली आहे. याकाळात भारतीय शेअर बाजार सार्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केल्यानंतर काही प्रमाणात हलका झाला आहे. लोकसभा निवडणुका, अर्थसंकल्प हे शेअर बाजारासाठी मोठे ट्रिगर्स ठरले आहेत. ( आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया कंपनी अंश )
पुढील काही आठवड्यात व्याजदरांबाबत RBI बँकेचे निर्णय देखील शेअर बाजारावर काहीसा परिणाम घडवून आणतील. अशा काळात शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया स्टॉक 0.57 टक्के वाढीसह 554.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया ही कंपनी मुख्यतः रिफॅक्टरी संबंधित व्यवसाय करते. आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया कंपनीचा व्यवसाय जगभरात 80 देशांमध्ये विस्तारला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीने दालमिया भारत रिफ्रॅक्टरीज आणि हाय-टेक केमिकल्स या दोन कंपन्याचे अधिग्रहण केले आहे.
आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया या कंपनीची उत्पादन क्षमता 5 लाख टन असून कंपनी फक्त 3.5 लाख टन उत्पादन घेत आहे. यासह कंपनीने नवीन अधिग्रहण करून आपली क्षमता वाढ करण्यावर भर दिला आहे. कंपनीने आपल्या लॉजिस्टिक समस्यांवरही काही प्रमाणत मात केली आहे. कंपनीने पोलाद क्षेत्रावरील आपले अवलंबित्व काही प्रमाणत कमी केले आहे.
शेअर बाजारातील तज्ञाच्या मते, आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया स्टॉक पुढील काळात 50 टक्के वाढू शकतो. आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया कंपनीची डिसेंबर तिमाहीची कामगिरी सकारात्मक होती. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये देखील सुधारणा पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 802 रुपये किमतीवरून घसरुन 512 रुपये किमतीवर आले होते. सध्या शेअर्सची कामगिरी पाहता तज्ञांनी हा स्टॉक 800 ते 810 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.