
RR Kabel Share Price | मागील आठव्यात बुधवारी आरआर काबेल कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आहेत. या इलेक्ट्रिकल वायर, स्विचेस, पंखे यांसारखी उत्पादने करणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात सकारात्मक लिस्टिंग केली आहे. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशीच आरआर काबेल या कंपनीचे शेअर्स 1035 रुपये या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 17 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते आरआर काबेल कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी आरआर काबेल स्टॉक 1.28 टक्के घसरणीवसह 1,166.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
लिस्टिंगच्या दिवशी प्रतिसाद
मागील आठवड्यात बुधवारी आरआर काबेल कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 13.91 टक्के वाढीसह 1179 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ट्रेडिंग दरम्यान हा स्टॉक 17.17 टक्क्यांच्या वाढीसह 1,212.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. आणि दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 15.61 टक्के वाढीसह 1,196.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आरआर काबेल कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 14 टक्क्यांच्या वाढीसह 1,180 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
IPO तपशील
आरआर काबेल कंपनीचे शेअर्स इतर कंपनीच्या स्टॉक सारखे नाही तर IPO अर्जाचा कालावधी संपल्यानंतर लगेच दोन दिवसात सूचीबद्ध करण्यात आले. आरआर काबेल कंपनीच्या IPO चा आकार 1,964 कोटी रुपये होता. आणि या कंपनीचा IPO एकूण 18.69 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 1,035 कोटी रुपये होती. तर कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 14 शेअर्स ठेवले होते. आरआर काबेल कंपनी जगभरात पाच उत्पादन युनिट ऑपरेट करते. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरच्या तज्ञांच्या मते आरआर काबेल स्टॉक पुढील काळात 1407 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.