
Rushil Decor Share Price | रुशील डेकोर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्के वाढीसह 392.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एका दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 12 टक्क्यांची बंपर तेजी पाहायला मिळाली होती. सध्या हा शेअर 3.10% वाढीसह 390.40 रुपयांवर ट्रेड करत आहे.
मागील एका महिन्यात रुशील डेकोर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. रुशील डेकोर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 429 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 204 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1020 कोटी रुपये आहे.
रुशील डेकोर कंपनीने नुकताच आपले सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रुशील डेकोर कंपनीने 6 टक्के वाढीसह 204.60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीचा EBITDA तिमाही आधारावर 5 टक्क्यांच्या घसरणीसह 29.45 रुपयेवर आला आहे.
रुशील डेकोर कंपनीचे EBITDA मार्जिन 14.39 टक्के आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रुशील डेकोर कंपनीचा PAT तिमाही आधारावर 13 टक्क्यांच्या घसरणीसह 10.55 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीचा ईपीएस मागील तिमाहीत 5.31 रुपयेवरून घसरून 3.88 रुपयेवर आला आहे.
सेबीला दिलेल्या माहितीनुसार रुशील डेकोर कंपनीने वीर MDF साठी AI टीव्ही जाहिरात संबंधित सेवा लाँच केली आहे. रुशील डेकोर कंपनीला आशा आहे की या नवीन जाहिरात व्यवसायामुळे कंपनीच्या कमाईत चांगली वाढ होईल. यासोबतच रुशील डेकोर कंपनी भारतात लॅमिनेट आणि एमडीएफ पॅनल बोर्ड बनवणारी अग्रणी कंपनी मानली जाते.
सध्या ही भांडवल उभारण्यासाठी विविध योजना आखत आहे. गुरुवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी रुशील डेकोर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत इक्विटी शेअर्स जारी करून भांडवल उभारणी करण्या संदर्भात चर्चा केली जाईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.