
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीने नुकतीच स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये महत्वाची अपडेट (NSE: RVNL) दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून वीज पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली (L1) लावणारी कंपनी म्हणून समोर (Gift Nifty Live) आली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून मिळणाऱ्या या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत ६४२.५७ कोटी रुपये आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
आरव्हीएनएल कंपनीने L1 बोली लावली
आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने पंजाब राज्यातील वीज पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी L1 बोली लावली आहे. पंजाब राज्यातील वीज पायाभूत सुविधा प्रकल्पाची एकूण किंमत ६४२.५७ कोटी रुपये आहे.
आरव्हीएनएल कंपनीची आर्थिक स्थिती
आरव्हीएनएल कंपनीचा निव्वळ नफा २७ टक्क्यांनी घसरून २८६.९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत ३९४.३ कोटी रुपये होता. जे कमी ऑपरेशनल मार्जिन आणि कमी कमाईमुळे आहे. दुसऱ्या तिमाहीतील ४,९१४.३ कोटी रुपयांच्या तुलनेत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या कामकाजातून मिळणारे उत्पन्न १.२ टक्क्यांनी घटून ४,८५५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
आरव्हीएनएल कंपनीचा EBITADA 9 टक्क्यांनी घसरून 271.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर मार्जिन मागील वर्षीच्या 6 टक्क्यांवरून 5.6 टक्क्यांवर आले आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या नफ्यात 28.1% वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा टॅक्स खर्च वार्षिक आधारावर ०.५ टक्क्यांनी घसरून ४,७३१.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, परंतु तिमाही आधारावर १७.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शेअरने 2109% परतावा दिला
मागील ५ दिवसात हा शेअर 1.40% घसरला आहे. मागील १ महिन्यात आरव्हीएनएल शेअर 2.21% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 7.86% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 153.10% परतावा दिल आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 139.75% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 1,745.03% परतावा दिला आहे. मात्र, लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 2,109.37% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.