
RVNL Share Price | बुधवार २७ नोव्हेंबर रोजी रेल्वे कंपनी शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला (NSE: RVNL) मिळाली होती. रेल विकास निगम लिमिटेड, आयआरएफसी लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स जवळपास ७ टक्क्यांनी वाढले होते. मागील १ वर्षात रेल्वे शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. मात्र हे शेअर्स त्यांच्या विक्रमी पातळीवरून २५ ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
आरव्हीएनएल कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट
आरव्हीएनएल कंपनीला पूर्व रेल्वेकडून मिळलेल्या नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये कालीडोंगरी ते प्रधानखुंटा दरम्यान मातीकाम आणि भराव, ब्लँकेट टाकणे, छोटे पूल, मोठे पूल, आरयूबी, आरओबी, रिटेनिंग वॉल, लेव्हल क्रॉसिंग, साइड ड्रेन, कॅच वॉटर ड्रेन आणि इतर कामांचा समावेश आहे.
आरव्हीएनएल कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट पुढील १६ महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे. आरव्हीएनएल कंपनीला पूर्व रेल्वेकडून मिळलेल्या नवीन कॉन्ट्रॅक्टचे मूल्य ८३७ कोटी रुपयांहून अधिक आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
क्लासिक पिव्हट लेव्हल
बुधवार 27 नोव्हेंबर 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 441.0 रुपये, 448.3 रुपये आणि 452.7 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 429.3 रुपये, 424.9 रुपये आणि 417.6 रुपये आहे.
शेअरने 1738% परतावा दिला
मागील ५ दिवसात आरव्हीएनएल शेअरने 3.54% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 1.86% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात आरव्हीएनएल शेअरने 16.80% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 165.11% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 1,738.62% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारवर शेअरने 141.95% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.