
RVNL Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसून आली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी घसरून 23900 अंकांच्या जवळपास ट्रेड करत होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 150 अंकांची घसरण झाली होती. दरम्यान, तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात.
Just Dial Share Price – NSE: JUSTDIAL
व्हेंचुरा रिसर्च ब्रोकरेज फर्मने जस्ट डायल लिमिटेड कंपनी शेअर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. व्हेंचुरा रिसर्च ब्रोकरेज फर्मने जस्ट डायल लिमिटेड कंपनी शेअर लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2920 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते जस्ट डायल लिमिटेड कंपनी शेअर पुढील 2 वर्षात गुंतवणूकदारांना 190% परतावा देऊ शकतो.
सध्या हा शेअर 987.05 रुपयांवर ट्रेड करतोय. जस्ट डायल कंपनी शेअरने ५ ऑगस्ट २०१४ रोजी १८९५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. म्हणजेच सध्या हा शेअर जवळपास ४७ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, २०२४ मध्ये आतापर्यंत जस्ट डायल कंपनी शेअरमध्ये २५ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर कंपनीचे फंडामेंटल मजबूत दिसत असल्याने ब्रोकरेजने तेजीचे संकेत दिले आहेत. २६ मार्च २०२० रोजी जस्ट डायल कंपनी शेअरचा आतापर्यंतचा नीचांकी स्तर २५१ रुपये होता.
आरव्हीएनएल शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल यांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर संवाद साधताना आरव्हीएनएल शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, आरव्हीएनएल शेअरची पहिली टार्गेट प्राईस ४८४ रुपये असेल. त्यानंतर आरव्हीएनएल शेअरसाठी ५१० रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस असेल. तज्ज्ञांनी गुंतवणूदारांना 450 रुपयांचा स्टॉप-लॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.