14 December 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

RVNL Share Price | संधी सोडू नका! तगडा परतावा देणार हा PSU शेअर, 3 दिवसात दिला 45% परतावा

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने धावत आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 620 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक किंचित नफा वसुलीला बळी पडला होता. मागील 3 दिवसात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 45 टक्के नफा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )

मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 रुपयेवरून वाढून 620 रुपये किमतीवर पोहोचली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 4500 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. मंगळवारी आरव्हीएनएल स्टॉकमध्ये 1.4 कोटी शेअर्सची ब्लॉक डील झाली होती. या व्यवहाराचे एकूण मुल्य 827 कोटी रुपये होते. ही ब्लॉक डील प्रति शेअर 585 रुपये किमतीवर झाली होती. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 9.12 टक्के वाढीसह 592.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

4 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 419 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 620 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 225 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 185.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 9 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 620 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 117.35 रुपये होती.

27 मार्च 2020 रोजी आरव्हीएनएल या रेल्वे कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 9 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 620 रुपये किमतीवर पोहचला होता. 2020-24 या कालावधीत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये 4500 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 122.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 620 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे. म्हणजेच मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 375 टक्केपेक्षा जास्त वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 10 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x