
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच IMS कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. ( आरव्हीएनएल अंश )
या सामंजस्य करारानुसार IMS कन्सल्टन्सी ही कंपनी आरव्हीएनएल कंपनीला नेपाळमधील रेल्वे एमआरटीए, बोगदा, रस्ता, हाय- एक्सप्रेस वे, पूल, इमारतीशी संबंधित काम, विमानतळ, बंदरे, सौर क्षेत्र, पवन क्षेत्र, हायड्रो सेक्टर या संबंधित कामासाठी सल्ला देणार आहे. यासह मंगळवारी आरव्हीएनएल कंपनीने नागपूर मेट्रो संबंधित कामाचे नवीन ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली होती. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.67 टक्के वाढीसह 634.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 13.78 टक्क्यांच्या वाढीसह 618 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचले होते. बुधवारी दिवसा अखेर आरव्हीएनएल स्टॉक 12.41 टक्क्यांच्या वाढीसह 610.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 235 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मार्च 2024 पर्यंत आरव्हीएनएल कंपनीमध्ये भारत सरकारने एकूण 72.84 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.