
RVNL Share Price| आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला दक्षिण रेल्वे विभागाकडून 156 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
या ऑर्डर अंतर्गत आरव्हीएनएल कंपनीला 3000 MT लोडिंग टारगेटला समर्थन देण्यासाठी राजखसवान-नयागड-बोलानी सेक्शनवरील 132 KV ट्रॅक्शन सबस्टेशन आणि सहाय्यक पोस्टचे डिझाइन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आरव्हीएनएल कंपनीला अठरा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.39 टक्के घसरणीसह 412.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आरव्हीएनएल कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राजखसवान-नयागढ-बोलानी विभागात 2×25 KV प्रणालीमध्ये 132 KV ट्रॅक्शन सबस्टेशन, सेक्शनिंग पोस्ट आणि सब सेक्शनिंग पोस्टचे डिझाइन, EPC मोडवर 3000 MT लोडिंग टार्गेट पूर्ण करण्यासाठी पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचे काम देण्यात आले आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 2.85 टक्के वाढीसह 408 रुपये किमतीवर ओपन झाला होता. दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये या शेअरने 414 रुपये किंमत स्पर्श केली होती. दिवसाअखेर हा स्टॉक 410 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 431.80 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 85.31 हजार कोटी रुपये आहे.
मागील 1 आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10.42 टक्के वाढली आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 57.07 टक्के वाढवले आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 231.79 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत आरव्हीएनएल स्टॉक तब्बल 1151.07 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.