12 December 2024 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

RVNL Share Price | PSU शेअरबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक तेजीत, 3 महिन्यात दिला 97% परतावा

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. मात्र काही दिवसापासून या स्टॉकमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 3.45 टक्क्यांच्या घसरणीसह 555.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

आज हा शेअर जोरदार तेजीत धावत आहे. आरव्हीएनएल स्टॉक आपल्या 647 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 14 टक्क्यांनी खाली आला आहे. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 4.23 टक्के वाढीसह 575.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आरव्हीएनएल स्टॉक मागील महिन्यात 647 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचला होता. मात्र त्यानंतर शेअरमध्ये प्रचंड नफा वसुली झाली, आणि शेअर 14 टक्क्यांनी खाली आला होता. आरव्हीएनएल स्टॉकचा P/E गुणोत्तर 79 पट आहे. आणि प्रइस-टू-बुक प्रमाण 15 पट आहे. तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत असून भविष्यात कंपनीची कमाई वाढू शकते. शेअर बाजारातील तज्ञांनी आरव्हीएनएल स्टॉक 3-5 वर्षांचा दीर्घ दृष्टिकोन ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 3-5 वर्षांत आरव्हीएनएल स्टॉक 1000 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

24 जुलै रोजी आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना दक्षिण पूर्व रेल्वेने 191 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने म्हंटले आहे की, त्यांना दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात राजखसवान-नयागढ-बोलानी मार्गावर 3000MT क्षमतेचे लोडिंग लक्ष्य साध्य करण्यासाठी 2×25 KV प्रणालीमध्ये 132 KV ट्रॅक्शन सबस्टेशन, सेक्शनिंग पोस्ट आणि सब सेक्शनिंग पोस्ट उभारण्याचे काम देण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 90.7 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 203.4 टक्क्यांनी वाढवले आहेत. मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 311 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 1694.5 टक्के, तीन वर्षात 1733.20 टक्के, आणि पाच वर्षात 2208 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 29 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x