RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर – NSE: RVNL

RVNL Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी मल्टीबॅगर रेल्वे स्टॉक रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर चर्चेत आला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने गुरुवारी मजबूत तेजीसह अप्पर सर्किट हिट केला होता. कारण आरव्हीएनएल कंपनीबाबत सकारात्मक अपडेट आली आहे.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी रेल विकास निगम लिमिटेड शेअर 8.78 टक्क्यांनी वाढून 404.55 रुपयांवर पोहोचला होता. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 647 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांचा नीचांकी पातळी 213.05 रुपये होती. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 84,266 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

आरव्हीएनएल कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला भारत संचार निगम लिमिटेडकडून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आरव्हीएनएल कंपनीला याबाबत मंजुरी पत्र प्राप्त झाले आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे. कंपनीने कॉन्ट्रॅक्टचा तपशील देताना सांगितले की, ‘आरव्हीएनएल कंपनीला भारत नेट मिड-माइल नेटवर्कचे डिझाइन, बांधकाम, अपग्रेड, ऑपरेट आणि मेंटेनन्ससाठी भारत संचार निगम लिमिटेड कंपनीकडून मान्यता मिळाली आहे.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात रेल विकास निगम कंपनी शेअरने 2.51% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात रेल विकास निगम कंपनी शेअर 13.91% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 34.77% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 80.97% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात रेल विकास निगम कंपनी शेअरने 1,502.18% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 1,948.35% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर रेल विकास निगम कंपनी शेअर 5.50% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price Thursday 16 January 2025 Marathi News.