3 May 2024 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदललं, 1 लाखाच्या गुंतवणूकीवर 53 कोटी परतावा दिला, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज या लेखात आम्ही तुम्हाला एका अशा कंपनीच्या शेअरबद्दल माहिती देणार आहोत,ज्याने आपल्या शेअरहोल्डर्सला करोडपती बनवले आहेत. कंपनीने दीर्घकाळात आपल्या भागधारकांना गुंतवणुकीवर जबरदस्त नफा कमावून दिला आहे. त्यासोबत कंपनीने अनेकदा बोनस शेअर्स ही वितरीत केले होते. आपण ज्या कंपनीची चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे “फिनिक्स मिल्स लिमिटेड”. ही एक लार्ज कॅप कंपनी असून स्थापनेपासून आतापर्यंत कंपनीने 1 वेळा बोनस शेअर वितरीत केला होता. जर या स्टॉक मध्ये तुम्ही सुरुवातीच्या काळात एक लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, तर सध्याच्या किमतीनुसार तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 53 कोटी रुपये झाले असते. चला तर मग जाणून घेऊ या कंपनी बद्दल सविस्तर माहिती.

फिनिक्स मिल्स शेअर्सचा इतिहास :
फिनिक्स मिल्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,428 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 ऑक्टोबर 1995 रोजी हा स्टॉक फक्त 1.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच, या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी आतापर्यंत 107,268.42 टक्के नफा कमावला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षात 173.64 टक्के आणि गेल्या तीन वर्षात 101.12 टक्के चा अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील फक्त एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 44.26 टक्के नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी, चालू वर्ष 2022 मध्ये, हा स्टॉक 46.08 टक्के वाढला आहे. जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या कंपनीमध्ये 47.32 टक्के वाटा प्रोमोटर कडे होता, FII कडे 31.60 टक्के, DII कडे 16.68 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांची भागीदारी 4.40 टक्के होती. कंपनीचे बाजार भांडवल 25,413.12 कोटी रुपये आहे.

फिनिक्स मिल्सची बोनस ऑफर :
जर तुम्ही सुरुवातीच्या काळात या शेअरमध्ये 1.33 रुपये किमतीवर फिनिक्स मिल्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तेव्हा तुम्हाला एकूण 75,187 शेअर्स मिळाले असते. तथापि, BSE वेबसाइटवरील डेटानुसार या कंपनीने 9 डिसेंबर 2005 रोजी आपल्या गुंतवणूकदारांना 4:1 च्या प्रमाणात बोनस शेअर वितरीत केले होते. बोनस जारी केल्यानंतर गुंतवणूकदारांचे शेअर्स 75,187 वरून 375,935 शेअर्स एवढे झाले असते. म्हणजेच, 1,428 रुपये या सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार तुम्हाला 53.68 कोटी रुपये परतावा मिळाला असता.

कंपनीचा व्यापार थोडक्यात :
फिनिक्स मिल्स लिमिटेड ही ग्राहक विवेकाधीन उद्योगात गुंतलेली लार्ज-कॅप कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये कंपनीने आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. फिनिक्स मिल्स लिमिटेडच्या व्यवसाय मध्ये मुख्यतः मोठे शॉपिंग मॉल्स, मनोरंजन केंद्रे, कार्यालयीन इमारती आणि हॉटेल्स यांचा समावेश होतो. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, पुणे, रायपूर, आग्रा, इंदूर, लखनौ, बरेली आणि अहमदाबाद अशा शहरांमध्ये GREP चा रिअल इस्टेट व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. किरकोळ, निवासी, व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्र हे या कंपनीच्या रिअल इस्टेट व्यवसायाचा एक भाग आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Phoenix Mills Limited share price return on investment on 09 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x