
RVNL Vs IRFC Share | आरव्हीएनएल या रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या घसरणीसह 256.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
मात्र त्यानंतर हा स्टॉक 11 टक्क्यांच्या घसरणीसह 250.40 रुपये किमतीवर आला होता. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 281.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 8.06 टक्के घसरणीसह 259 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
आरव्हीएनएल कंपनीने गुरुवारी आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. यात कंपनीने सांगितले की ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 358.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 382.40 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6.3 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे.
तर कंपनीचा EBITDA देखील 10 टक्क्यांनी घसरला आहे. या कंपनीचा परिचालन महसूल वार्षिक आधारावर 6.4 टक्क्यांनी घसरला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत आरव्हीएनएल या सरकारी कंपनीने 4689.30 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 5012.10 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा EBITDA 9.6 टक्क्यांच्या घसरणीसह 249 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
मागील एका महिन्यात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 103 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 256 टक्के परतावा कमावून दिला आहे. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.15 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.