 
						RVNL Vs Jupiter Wagons Share | मागील एका वर्षात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 331.29 टक्के वाढवले आहेत.
ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 241 टक्के वाढ नोंदवली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 310.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीने 82.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीने 24.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीने 112 टक्क्यांच्या वाढीसह 885.1 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीने 417.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील एका वर्षात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 331.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 73.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर हा स्टॉक 317.00 रुपये किमतीवर पोहचले होते.
ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,977 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 324.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 313.15 रुपये होती. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरचा RSI 50.2 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये.
मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीने 143.75 टक्के वाढीसह 120 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 75.45 टक्क्यांच्या वाढीसह 2073 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः भारतीय रेल्वेसाठी वॅगन्स बनवण्याचे काम करत आहे. सध्या ज्युपिटर वॅगन्स कंपनीची वॅगन निर्मिती क्षमता वर्षाला 7400 वॅगन तयार करण्याची आहे. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीने 2023 या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपली वार्षिक क्षमता 8400 वॅगन्स करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनी एकात्मिक सुविधा म्हणजे रेल्वे वॅगन, हाय-स्पीड बोगी आणि रेल्वे कास्टिंग्ज तयार करण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		