
Sakuma Share Price | सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 9 टक्के वाढीसह 34.92 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील दोन दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )
शुक्रवारी सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 34.96 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 13.15 रुपये होती. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी सकुमा एक्सपोर्ट्स स्टॉक 5.87 टक्के घसरणीसह 32.85 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
मार्च 2024 तिमाहीत सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीने वार्षिक आधारावर 157 टक्के वाढीसह 26.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 10.11 कोटी रुपये नोंदवला गेला होता. डिसेंबर 2023 या तिमाहीत सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीने 6.45 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 च्या तिमाहीत या कंपनीने 500.55 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा महसूल 50 टक्के नोंदवला गेला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 777.07 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मागील 6 महिन्यांत सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 129 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 1 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 34.92 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 31 मे 2024 रोजी हा स्टॉक 34.92 रुपये किमतीवर पोहचला होता. 2024 मध्ये सकुमा एक्सपोर्ट्स स्टॉक तब्बल 85 टक्क्यांनी वाढला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 18.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 32 रुपयांच्या पुढे गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.