
Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीत असताना या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह 20.45 रुपयये किमतीवर ट्रेड करत होते. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3530 कोटी रुपये आहे. ( सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनी अंश )
सालासर टेक्नो इंजिनियरिंग या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8.28 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी सालासर टेक्नो इंजिनियरिंग स्टॉक 4.89 टक्के वाढीसह 21.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 5 दिवसांत सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 109 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 8.5 रुपये या नीचांक किमतीवरून 140 टक्के वाढली आहे.
मागील 4 वर्षात सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2590 टक्के परतावा कमावून दिला आहे. 17 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 76 पैशांवर ट्रेड करत होते. या नीचांकी किमतीवरून हा स्टॉक 2590 टक्के वाढला आहे. नुकताच या कंपनीने सेबीला माहिती दिली की, त्यांनी मेसर्स ईएमसी लिमिटेड ही दिवाळखोरी प्रक्रियेतून जाणारी कंपनी खरेदी केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.