Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन सह या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, मालामाल करणार
Samvardhana Motherson Share Price | मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर अनेक जागतिक ब्रोकरेज फर्मनी टाटा स्टील, जीएमआर विमानतळ, कमिन्स इंडिया, संवर्धन मदरसन आणि अल्केम लॅब स्टॉकबाबत अहवाल प्रसिद्ध करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.
सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. तुम्ही वर नमूद करण्यात आलेले शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकतात. या शेअर्सची टार्गेट प्राइस अपग्रेड करण्यात आली आहे.
जीएमआर एअरपोर्ट :
जेफरीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 100 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीचा EBITDA 2.8x वार्षिक वाढेल. 2024 मध्ये कंपनीचा EBITDA 70 टक्के वाढीसह 2970 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. हैदराबादमधील उच्च एरो टॅरिफमुळे कंपनीच्या EBITDA मध्ये वाढ झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.76 टक्के वाढीसह 84.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कमिन्स इंडिया :
नोमुरा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 3040 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मार्च 2024 तिमाहीमध्ये या कंपनीचा नफा 51 टक्के जास्त वाढला आहे. तिमाही आधारावर या कंपनीचा EBITDA मार्जिन 23.5 टक्के वाढला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीचे वार्षिक उत्पन्न 20 टक्के वाढले असून कंपनीची देशांतर्गत विक्री 38 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के घसरणीसह 3,545.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
संवर्धन मदरसन :
जेफरीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 175 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मार्च 2024 तिमाहीत कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 48 टक्के वाढला आहे. तर तिमाही आधारावर त्यात 20 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे निव्वळ कर्ज तिमाही आधारावर 14 टक्के कमी झाले आहे. तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत या कंपनीचा EPS 14 टक्के वाढू शकतो. नोमुरा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 165 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के वाढीसह 152.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अल्केम लॅबोरेटरीज :
जेफरीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 4200 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मार्च तिमाहीत कंपनीची देशांतर्गत विक्री अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिली आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कंपनीची उत्पन्न वाढ 10 टक्के असेल. कंपनीचा EBITDA मार्जिन 20-30 बेसिस पॉइंटने कमी राहण्याचा अंदाज आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.79 टक्के घसरणीसह 4,858.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा स्टील :
जेफरींज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 200 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीचा EBITDA 5 टक्के वाढला आहे. तर YOY आधारे कंपनीचा EBITDA 9 टक्के घसरला आहे. कंपनीचा प्रति टन स्टँडअलोन EBITDA तिमाही आधारावर 12 टक्के घसरला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीचा प्रति टन EBITDA लॉस 40 दशलक्ष डॉलर्स होता. मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर 135 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचा एकत्रित EBITDA अंदाजापेक्षा चांगला आहे. या कंपनीची देशातील आणि देशाबाहेरील व्यवसायाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 166.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Samvardhana Motherson Share Price NSE Live 31 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News