3 May 2024 8:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Demat Account | तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, डिमॅट सेफ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Demat Account

Demat Account | शेअर बाजारात आपण ज्या शेअर्सची खरेदी-विक्री करतो, ते शेअर्स आपल्या डीमॅट खात्यात म्हणजेच Demat Account मध्ये जमा होतात. त्याचबरोबर डीमॅट खात्यात तुमचे शेअर्स आणि पैसे दोन्ही जोडले जातात. डिमॅट खाते पूर्णपणे ऑनलाइन ऑपरेट करता येते. त्यामुळे ऑनलाईन फ्रॉड होण्याचा किंवा फसवणूक होण्याची जोखीम जास्त असते. डिमॅट अकाउंटमधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती घेऊ. लोकांमध्ये शेअर बाजाराचे आकर्षण खूप वाढले आहे, आणि मोठ्या संख्येने सर्वसामान्य लोक आता शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी नवीन डीमॅट अकाउंट सुरू केले आहेत.

डीमॅट खात्याचा उपयोग आणि फायदे :
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी किंवा आपले पैसे लावून गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याची हाताळणी करताना त्याचे फायदे आणि तोटे माहीत असणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याद्वारे आपण शेअर्सची खरेदी विक्री आणि हस्तांतरित सहज करू शकतो. शिवाय डिमॅटमध्ये आपण ट्रेडिंगचे व्यवहार सहजपणे पूर्ण करू शकतो. याशिवाय डिमॅट खात्यात तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा लॉगिन आणि लॉग आऊट करू शकता. तुमच्या डीमॅट खात्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यात बोनस स्टॉक, राइट्स इश्यू आणि स्प्लिट शेअर्स आपोआप जमा केले जातात.

डिमॅट खात्याच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी काही उपाय :

लॉगिन डिटेल्स सुरक्षित ठेवा :
तुम्ही जेर डिमॅट अकाउंट वापरता असाल तर एक तुमच्याकडे मजबूत पासवर्ड असला पाहिजे. तुम्ही आपले पासवर्ड आणि लॉग इन डिटेल काळजीपूर्वक सेव्ह करून ठेवले पाहिजे. पासवर्ड शक्यतो लक्ष्यात ठेवावा, कुठेही लिहून ठेवू नये. तसेच पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.

अकाउंट स्टेटमेंटवर लक्ष असू द्या :
तुमचा फोन नंबर आणि ई-मेल आयडी नेहमी अपडेट करावा. डिपॉझिटरीद्वारे तुम्हाला पाठवलेले सर्व स्टेटमेंट आणि एसएमएस काळजीपूर्वक वाचा आणि त्यांना जतन करा. नेहमी आपल्या खात्यातील व्यवहारांवर बारकाईने लक्ष असू द्या. तुमच्या डीमॅट खात्यातील सर्व व्यवहार आणि ट्रेडिंग अॅक्टिव्हिटी तपासत राहा. अकाउंटमध्ये कोणतीही विसंगती आढळली तर तात्काळ डिपॉझिटरीला तक्रार करा.

पॉवर ऑफ अॅटर्नी :
तुमचा डिपॉझिटरी पार्टिसिपंट कोणत्याही हेराफेरी च्या व्यापारात गुंतलेला नाही याची खात्री करा. यामुळे तुमच्या ब्रोकरद्वारे तुमच्या डिमॅट खात्यात फसवणूक किंवा काही गैर व्यवहार करण्याची शक्यता कमी होईल.

तुमचे खाते फ्रीझ करा :
तुम्ही जर तुमच्या डीमॅट खात्याचा वापरच करत नसाल तर तुमचे डिमॅट खाते फ्रीझ करा. किंवा तत्काळ बंद करून टाका.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आधी तुम्ही डिमॅट अकाऊंट आणि ट्रेडिंग अकाऊंट उघडले पाहिजे. बॅंकेत व्यवहार करण्यासाठी तुम्हाला जशी बॅंक खात्याची गरज असते तसेच शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते उघडावे लागते. शेअर मार्केटमध्‍ये गुंतवणूक सुरू करण्‍यासाठी, तुम्‍हाला तीन प्रकारच्या अकाउंटची गरज लागते. ही तीन खाती म्हणजे डिमॅट अकाऊंट, ट्रेडिंग अकाऊंट आणि बँक अकाऊंट असल्यावरच तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता.

जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केट मधून एखाद्या कंपनीचे स्टॉक खरेदी करता, तेव्हा ते शेअर्स जमा करण्यासाठी एका खात्याची आवश्यकता असते, याला डीमॅट अकाऊंट म्हणतात. जसे तुम्ही बॅंक खात्यातून पैसे काढता किंवा पैसे जमा करता तसेच डीमॅट खात्यात ही व्यवहार केले जातात. डीमॅट अकाऊंटमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स किंवा सिक्युरिटीज जमा करता येते. ही खाती तुमचे शेअर्स सांभाळतात. तुमच्या शेअर्सचा सर्व लेखाजोखा तुम्हाला डीमॅट अकाऊंट स्टेटमेंट मधून मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Demat Account opening procedure and Solutions on avoiding scam in Demat account on 03 November 2022.

हॅशटॅग्स

#Demat Account(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x