
Sanofi India Share Price | ‘सनोफी इंडिया’ या फार्मास्युटिकल्स कंपनीने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. ‘सनोफी इंडिया’ कंपनीने आपला Consumer Healthcare व्यवसाय वेगळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘सनोफी इंडिया’ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या Consumer Healthcare व्यवसायाचे प्रस्तावित पूर्ण मालकीच्या उपकंपनी सनोफी कंज्यूमर हेल्थकेयर इंडिया लिमिटेड मध्ये विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. या बातमीमुळे सनोफी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशमध्ये सनोफी इंडिया कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 6180 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारी सनोफी इंडिया कंपनीचे शेअर्स 5698 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘सनोफी इंडिया’ कंपनीचे शेअर्स 2.33 टक्के वाढीसह 6,350.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सनोफी इंडिया शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7020 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5240 रुपये होती. सनोफी इंडिया कंपनीचे शेअर्स मागील 5 दिवसात 13.83 टक्के मजबूत झाले आहेत.
सनोफी कंज्यूमर हेल्थकेयर इंडिया लिमिटेड ही नवीन कंपनी NSE आणि BSE या दोन्ही एक्सचेंजेसवर सुचीबद्ध केली जाणार आहे. सनोफी कंज्यूमर हेल्थकेयर इंडिया लिमिटेड ही सनोफी इंडिया कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नोटिफिकेशनमध्ये माहिती दिली आहे की, सनोफी कंझ्युमर हेल्थकेअर 2024 च्या उत्तरार्धात पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकते.
कंपन्यांचे प्रस्तावित डिमर्जर पूर्ण झाल्यावर, सनोफी इंडिया कंपनी सनोफी कंझ्युमर हेल्थकेअर कंपनीमध्ये 60.4 टक्के भाग भांडवल धारण करेल. सनोफी इंडिया कंपनीच्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात कंपनीच्या प्रत्येक शेअरवर सनोफी कंज्यूमर हेल्थकेयर इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स दिले जाईल.
सनोफी इंडिया कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2100 टक्के परतावा कमावून दिला आहे. Sanofi India कंपनीचे शेअर्स 2 मे 2003 रोजी 280.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6180 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.