
Sansera Share Price | मागील आठवड्यात शेअर बाजारात मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली. चालू आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात संसेरा इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज फर्म ॲक्सिस सिक्युरिटीजने ऑटो कॉम्पोनंट्स अँड इक्विपमेंट्स सेक्टरमधील दिग्गज कंपनी संसेरा इंजिनीअरिंगचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( संसेरा इंजिनीअरिंग कंपनी अंश )
आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी संसेरा इंजिनीअरिंग स्टॉक 0.51 टक्के घसरणीसह 1,047.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्मनुसार संसेरा इंजिनीअरिंग कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या मार्च तिमाहीत मजबूत EBITDA मार्जिन नोंदवला आहे. या कंपनीचा कॅपेक्स आणि वैविध्यपूर्ण व्यवसायामुळे कंपनीच्या EBITDA मध्ये मजबूत वाढ झाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.
ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या अहवालानुसार संसेरा इंजिनीअरिंग कंपनीचा महसूल आणि EBITDA अंदाजापेक्षा चांगला आला आहे. संसेरा इंजिनीअरिंग कंपनीकडे 80 पेक्षा जास्त उत्पादनांचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. ही कंपनी जगभरात 26 विविध देशांमध्ये 95 ऑटो आणि नॉन-ऑटो ग्राहकांना सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे, की संसेरा इंजिनीअरिंग कंपनी ऑटो-आयसीई, ऑटो टेक अज्ञेयवादी आणि xEV, नॉन-ऑटो व्यवसाय यांच्याकडून अनुक्रमे 60:20:20 या प्रमाणात महसूल योगदानाच्या दृष्टिकोनाने प्रगती करत आहे.
24 मार्च 2024 पर्यंत या कंपनीचा वार्षिक महसूल 1,592 कोटी रुपये नोंदवला गेला होता. यापैकी 51 टक्के महसूल नॉन-ऑटो ICE सेगमेंटमधून आला आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग उत्पादन वाढीला चालना देत आहे. संसेरा इंजिनीअरिंग कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाला कमाईत सरासरी 10 टक्के अतिरिक्त वाढीची अपेक्षा आहे. पुढील काही वर्षांत एरोस्पेस/टेक क्षेत्रात 40 टक्के वार्षिक वाढ आणि EV व्यवसायात 100 टक्के वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेज फर्मने संसेरा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 1270 रुपये निश्चित केली आहे. 18 मे रोजी या कंपनीचे शेअर 1.53 टक्क्यांच्या वाढीसह 1058.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, संसेरा इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स पुढील काळात 20 टक्क्यांनी वाढू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.