 
						Saregama Share Price | मागील 1 महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत होती. मात्र आज स्टॉकच्या तेजीला ब्रेक लागला आहे. मागील एका महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 27.44 टक्के परतावा कमावून दिला आहे.
शुक्रवारी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 410.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के घसरणीसह 398.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स सेबीच्या निरीक्षण कक्षा स्टेज-1 अंतर्गत ठेवण्यात आले आहे. म्हणजेच त्यावर सेबी द्वारे कडक लक्ष ठेवले जाणार आहे. मागील 10 वर्षांत सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5100 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी सारेगामा इंडिया स्टॉकवर 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले आहे.
मागील 5 वर्षांत सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 464.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. सेबीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सेबी काही कंपन्यांच्या शेअर्सला निरीक्षण कक्षेत ठेवते. गुंतवणूकदारांचे नुकसान होण्यापासून टाळण्यासाठी सेबी असे पावले उचलत असते. सेबी द्वारे कंपनीला निरीक्षण कक्षेत ठेवणे, म्हणजे त्याला कंपनीविरुद्ध कठोर कारवाई म्हणून पाहू नये.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		