14 May 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील?
x

Oppositions Meeting | विरोधकांची बेंगळुरू येथे १३ आणि १४ जुलै रोजी होणारी बैठक पुढे ढकलली, खरं कारण आलं समोर

Oppositions Meeting postponed

Oppositions Meeting | भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधी पक्षएकत्र येण्याची दुसरी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे १३ आणि १४ जुलै रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, बैठकीच्या नव्या तारखेबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. पावसाळी अधिवेशनानंतर विरोधकांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. या घडामोडीचा संबंध नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षातील बंडखोरीशी जोडला जातं असला तरी वास्तविक दुसरंच कारण समोर आलं आहे.

कर्नाटकातील बेंगळुरू येथे होणारी पुढील बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर पुढील बैठक होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होऊन २० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या या बैठकीला सुमारे १५ पक्षांचे नेते उपस्थित होते.

मुख्य काय आहे कारण?
बिहार विधानसभेचे १० जुलै ते १४ जुलै दरम्यान होणारे पावसाळी अधिवेशन आणि कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बेंगळुरूयेथे होणारी बैठक पुढे ढकलण्याची विनंती राष्ट्रीय जनता दल आणि जेडीयूने काँग्रेस नेतृत्वाला केल्याचे बोलले जात आहे. पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक पुढे ढकलण्याचे आवाहनही कर्नाटक काँग्रेसने हायकमांडला केल्याचे समजते.

अजित पवारांची बंडखोरी कारणीभूत आहे का?
विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षांची दुसरी बैठक सिमल्याऐवजी १३-१४ जुलै रोजी कर्नाटकच्या राजधानीत होणार असल्याचे जाहीर केले होते. हवामानाचा हवाला देत त्यांनी गुरुवारी ही माहिती दिली होती. आता बेंगळुरूची बैठक पुढे ढकलल्याचा संबंध राष्ट्रवादीतील फुटीशी जोडून पाहिला जाऊ शकतो. शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या शेवटच्या बैठकीलाही हजेरी लावली होती. त्याचबरोबर विरोधकांच्या ऐक्याचे मुख्य नेत्यांपैकी शरद पवार हे एक प्रमुख नेते होते.

News Title : Oppositions Meeting postponed check details on 03 July 2023.

हॅशटॅग्स

#Oppositions Meeting postponed(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x