2 May 2025 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Sarkari NPS Account | काय सांगता! NPS मध्ये 5000 जमा करून आयुष्यभर 44,793 रुपये पेन्शन मिळणार? योजनेचे फायदे पहा

Sarkari NPS Account

Sarkari NPS Account | आतापासूनच योग्य आर्थिक नियोजन करून तुम्ही तुमचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य चिंतामुक्त बनवू शकता. गुंतवणुकीच्या एका सूत्राचा वापर केला तर तुमच्याकडे सेवानिवृत्तीनंतर एक मोठा फॅट फंड तयार झाला असेल आणि तुम्हाला नियमित पेन्शनही चालू होईल. ही योजना तुम्हाला भविष्यात पैशाची कमतरता अजिबात भासू देणार नाही. आपण ज्या योजनेबद्दल चर्चा करतोय, तीचे नाव आहे,’नॅशनल पेन्शन स्कीम’. ही योजना तुम्हाला दुहेरी फायदा मिळवून देते. पत्नीच्या नावाने या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला काय फायदा होईल, याची आपण सविस्तर चर्चा करू.

NPS मध्ये गुंतवणूक :
NPS योजनेत तुम्ही पत्नीच्या नावाने गुंतवणूक सुरू केल्यास 60 व्या वर्षी तुम्हाला एकरकमी परतावा मिळेल. ही योजना तुम्हाला दरमहा पेन्शनही मिळवून देईल. NPS योजना नियमित पेन्शन उत्पन्न म्हणून चांगली रक्कम कमावून देऊ शकते. NPS खात्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा किती पेन्शन पाहिजे, हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.

NPS खात्यातील गुंतवणूकीची वयवारी :
NPS योजनेत पत्नीच्या नावाने गुंतवणूक सुरू केल्यास आणखी एक मोठा फायदा मिळेल तो म्हणजे, तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावाने या योजनेत 65 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय दिला जाईल. सहसा NPS योजनेतील गुंतवणूक वयाच्या 60 व्या वर्षी परिपक्व होते. NPS मध्ये तुम्ही दर महिन्याला किंवा वार्षिक आधारावर पैसे गुंतवू शकता. NPS मध्ये गुंतवणूक सुरू करण्याची किमान रक्कम मर्यादा 1,000 रुपये आहे.

NPS मधून मिळवा 1 कोटी 11 लाख परतावा :
समजा तुमच्या पत्नीचे सध्याचे वय 30 वर्ष आहे, आणि तुम्ही पत्नीच्या नावाने NPS योजनेत दर महा 5000 रुपयांची गुंतवणुक सुरू केली. जर यावर तुम्हाला सरासरी वार्षिक 10 टक्के परतावा मिळाला तर तुमच्या पत्नीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला एकूण 1 कोटी 11 लाख 98 हजार 471 रुपये परतावा मिळेल. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमच्या पत्नीला एकरकमी 45 लाख रुपये व्याज मिळेल. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शनपोटी दरमहा 45000 रुपये नियमित पेन्शन मिळेल. आणि ही पेन्शन रक्कम तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील.

NPS योजनेतील परताव्याची गणना :
* गुंतवणूकदारांचे अंदाजित वय : 30 वर्षे
* गुंतवणूक कालावधी : 30 वर्षे
* मासिक योगदान रक्कम : 5,000
* अंदाजे वार्षिक सरासरी परतावा : 10 टक्के
* मॅच्युरिटीवर एकूण परतावा : 1,11,98,471 रुपये
* प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम : 44,79,388 रुपये
* व्याज परतावा एकूण रक्कम : 67,19,083 रुपये
* मासिक पेन्शन रक्कम : 44,793 रुपये

NPS योजनेबद्दल थोडक्यात :
NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेची एक विशेष गोष्ट अशी की, तुम्ही योजनेत जे पैसे गुंतवतात ते पैसे व्यावसायिक निधी व्यवस्थापक यांच्याकडून व्यवस्थापित केले जातात. केंद्र सरकार व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना फंड हाताळण्याची जबाबदारी देते. म्हणूनच NPS खात्यातील गुंतवलेले रक्कम संपूर्णपणे सुरक्षित असते. केवळ बाजाराशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या योजनावर परताव्याची हमी दिली जात नाही. परंतु मागील काही वर्षांत NPS योजनेने वार्षिक सरासरी 10-12 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे अनेक लोकांची निवृत्तीनंतरची पैशांची चिंता दूर झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarkari NPS Account scheme for investment on long term basis for earning huge Return on 05 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Sarkari NPS Account(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या