
Sarveshwar Foods Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 87 अंकांच्या वाढीसह 72170 अंकांवर ट्रेड करत होता. निफ्टी निर्देशांक 54 अंकांच्या वाढीसह 21908 अंकांवर ट्रेड करत होता. शेअर बाजारातील अशा तेजी-मंदीच्या काळात सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.5 टक्क्यांच्या वाढीसह 8.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.60 टक्के वाढीसह 9.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
सर्वेश्वर फूड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 866 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 15.69 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4 रुपये होती. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. 5 जानेवारी 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून हा स्टॉक 50 टक्के मजबूत झाला आहे.
सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 15 सप्टेंबर 2023 रोजी विभाजित करण्यात आले होते. तेव्हा 14.52 रुपये किमतीवर ट्रेड करणार स्टॉक 4.90 रुपये किमतीवर आला होता. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड ही कंपनी 2004 साली जम्मू काश्मीरमध्ये सुरू झाली होती. ही कंपनी मुख्यतः बासमती तांदळाचे उत्पादन, व्यापार आणि निर्यात संबधित व्यवसाय करते.
सर्वेश्वर फूड कंपनीचे शेअर्स 9 एप्रिल 2020 रोजी 8.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 सप्टेंबर 2023 पर्यंत या कंपनीचे शेअर्स 116 रुपये किमतीवर पोहोचले होते. याकाळात सर्वेश्वर फूड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 14 पट अधिक वाढवले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.