
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स या FMCG क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 14.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सर्वेश्वर फूड्स कंपनीने दीर्घकालीन व्यवसाय वाढीसाठी आणि आपल्या आर्थिक संसाधनांना चालना देण्यासाठी भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली आहे. कंपनी भांडवल उभारणीसाठी गुंतवणूकदारांना 9.70 रुपये किमतीवर 10,20,00,000 वॉरंट जारी करणार आहे.
सध्या सर्वेश्वर फूड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,467.25 कोटी रुपये आहे. डिसेंबर तिमाहीत सर्वेश्वर फूड्स कंपनीची निव्वळ विक्री 24.7 टक्क्यांच्या वाढीसह 229.38 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 186.6 टक्क्यांच्या वाढीसह 4.93 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
सर्वेश्वर फूड्स लिमिटेड ही कंपनी ISO 22000:2018, USFDA, BRC, NPPO USA आणि चीन आणि NOP – USDA ऑरगॅनिक प्रमाणपत्र प्राप्त असलेली उच्च प्रमाणित कंपनी म्हणून ओळखली जाते. सर्वेश्वर फूड्स कंपनी बासमती आणि गैर-बासमती तांदूळ या दोन्हीचे उत्पादन, प्रक्रिया, व्यापार आणि मार्केटिंगमध्ये एक्स्पर्ट मानली जाते. सर्वेश्वर फूड्स कंपनी जम्मू काश्मीर तसेच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यवसाय करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.