27 July 2024 7:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Zomato Share Price

Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 191.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( झोमॅटो कंपनी अंश )

झोमॅटो कंपनीचा आयपीओ 76 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. आता या कंपनीचे शेअर्स 190 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 51.30 रुपये होती. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 2.03 टक्के वाढीसह 190.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील एका वर्षभरात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 271 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 एप्रिल 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 51.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत झोमॅटो स्टॉक 83 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 105.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

डोमेस्टिक ब्रोकरेज हाऊस कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने झोमॅटो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 210 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मार्च 2024 च्या तिमाहीत झोमॅटो कंपनीच्या कामगिरीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. झोमॅटो स्टॉक पुढील काळात मजबूत परतावा देऊ शकतो, याबाबत तज्ञांना पूर्ण विश्वास आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price NSE Live 06 April 2024.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x