15 December 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

Motilal Oswal Mutual Fund | मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंडच्या टॉप 5 योजना, 1 वर्षात मिळू शकतो 94 टक्क्यांपर्यंत परतावा

Motilal Oswal Mutual Fund

Motilal Oswal Mutual Fund | म्युचुअल फंड हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या अनेक म्युचुअल फंड आणि गुंतवणूक योजना आहेत, ज्यांची मागील एक वर्षातील कामगिरी आणि परतावा छप्पर फाड आहे.

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड:
फंड हाऊस मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाच्या खूप म्युच्युअल फंड योजना गुंतवणूक बाजारात सुरू आहेत. या फंडाची मागील एक वर्षाची कामगिरी आणि परतावा जबरदस्त आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 94 टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा मिळाला आहे. या फंडांमध्ये वर्षभरापूर्वी केलेल्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मूल्य आज तब्बल 1.94 लाख रुपये परतावा मिळाला आहे. मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंड च्या टॉप 5 योजनांबद्दल सांगायचे झाले तर, त्यांना 70 टक्के ते 94 टक्के परतावा मिळाले आहेत.

मोतीलाल ओसवाल निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड :
मोतीलाल ओसवाल निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंडाने मागील 1 वर्षात तब्बल 93.91 टक्के परतावा दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे. तर किमान 500 रुपयांची SIP सुरू करता येते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या फंडाची एकूण मालमत्ता 221 कोटी रुपये होती. त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.31 टक्के होते. ही योजना 6 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. या फंडात 1 वर्षापूर्वी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता वाढून 1.94 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य आता 1.53 लाख रुपये झाले आहे.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप 100 ETF :
मोतीलाल ओसवाल मिड कॅप 100 ईटीएफ फंड योजनेने मागील 1 वर्षात 83.23 टक्के परतावा दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी 500 रुपये गुंतवता येतात. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या फंडाची एकूण मालमत्ता 80 कोटी रुपये होती. आणि खर्चाचे प्रमाण फक्त 0.20 टक्के होते. या योजनेची सुरुवात 31 जानेवारी 2011 रोजी करण्यात आली होती. 1 वर्षापूर्वी या फंडात केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 1.83 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक SIP गुंतवणुकीचे मूल्य 1.51 लाख रुपये झाले आहे.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप 30 फंड :
मोतीलाल ओसवाल मिड कॅप 30 फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 80.43 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी 500 रुपये गुंतवता येतात. त्याच वेळी, किमान 500 रुपयांची एसआयपी करता येते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत फंडाची मालमत्ता 2,367 कोटी रुपये होती. त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.85 टक्के होते. ही योजना 24 फेब्रुवारी 2014 रोजी सुरू करण्यात आली होती.

मोतीलाल ओसवाल निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फंड:
मोतीलाल ओसवाल निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स फंडाने मागील 1 वर्षात 79 टक्के परतावा दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी 500 रुपये गुंतवणूक करता येते. त्याच वेळी, किमान 500 रुपयांची एसआयपी केली जाऊ शकते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या फंडाची एकूण मालमत्ता 358 कोटी रुपये होती. आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण फक्त 0.21 टक्के होते. ही योजना 6 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. या म्युचुअल फंडात केलेली 1 वर्षापूर्वीची 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज वाढून 1.79 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या SIP गुंतवणुकीचे मूल्य 1.49 लाख रुपये झाली आहे.

मोतीलाल ओसवाल लार्ज आणि मिडकॅप फंड :
मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिड कॅप फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 70.23 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी 500 रुपये गुंतवणूक करता येते. त्याच वेळी, किमान 500 रुपयांची एसआयपी करता येते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या फंड ची एकूण मालमत्ता 852 कोटी रुपये होती. आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.68 टक्के होते. ही योजना 17 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. 1 वर्षापूर्वी या फंडात केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता 1.70 लाख रुपये च्या वर गेली आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक SIP गुंतवणुकीचे मूल्य 1.46 लाख रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Motilal Oswal Mutual Fund investments for long term benefits on 13 August 2022.

हॅशटॅग्स

Motilal Oswal Mutual Fund(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x