
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड या एफएमसीजी कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्ससह स्टॉक स्प्लिटचा फायदा देणार आहे. या कंपनीने आधीची निर्धारित रेकॉर्ड तारीख बदलली असून, सेबीला याबाबत अपडेट कळवली आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 131.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची आणि स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. आणि त्यासाठी कंपनीने 5 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला होता. मात्र आता कंपनीने रेकॉर्ड तारीख मध्ये बदल केला आहे. आणि ही अपडेट सेबीला देखील कळवली आहे. नवीन बदलानुसार कंपनीने रेकॉर्ड तारीख 15 सप्टेंबर 2023 रोजी निश्चित केली आहे.
सर्वेश्वर फूड्स कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. आणि कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या घसरणीसह 131.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज हा स्टॉक 131.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिनाभरात सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27.19 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 180.34 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 49.12 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.