2 June 2023 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 03 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा
x

SBI Annuity Deposit Scheme | एसबीआय FD पेक्षा अधिक व्याज देईल ही SBI योजना, दरमहा व्याजाने महिन्याचा खर्च भागेल

Highlights:

  • SBI Annuity Deposit Scheme
  • दरमहा हमखास व्याज परतावा
  • किमान 1000 रुपये गुंतवणूक
  • 75 टक्के ओव्हरड्राफ्ट सुविधा
  • वार्षिक परतावा
SBI Annuity Deposit Scheme

SBI Annuity Deposit Scheme | भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक हमखास परतावा देणाऱ्या योजना राबवते. अशाच एका जबरदस्त योजनेचे नाव आहे,”SBI अॅन्युइटी डिपॉझिट स्कीम”. या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणुक करु शकता.

दरमहा हमखास व्याज परतावा

ही योजना तुम्हाला एकरकमी गुंतवणुकीवर दरमहा हमखास व्याज परतावा मिळवून देते. एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला दरमहा मूळ जमा रकमेवर व्याज परतावा दिला जातो. या योजनेतील ठेवीवर प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ पद्धतीने व्याजाची गणना केली जाते.

SBI च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहिती नुसार एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये बचत खात्यापेक्षा जास्त व्याज परतावा दिला जातो. या योजनेतील ठेवीवर बँकेच्या मुदत ठेवीवर म्हणजेच एफडी वर जो व्याज दर मिळतो, त्याच दराने परतावा दिला जातो. या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला युनिव्हर्सल पासबुकही दिले जाईल.

किमान 1000 रुपये गुंतवणूक

ही योजना तुम्हाला 36, 60, 84 आणि 120 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याची मुभा देते. ही योजना SBI बँकेच्या च्या सर्व शाखांमध्ये आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यात कोणतीही कमाल ठेवी मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्याच वेळी या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान 1000 रुपये जमा करावे लागेल.

75 टक्के ओव्हरड्राफ्ट सुविधा

SBI च्या अॅन्युइटी योजनेत या योजनेत गरज भासल्यास तुम्ही शिल्लक रकमेच्या 75 टक्के रक्कम ओव्हरड्राफ्ट/कर्ज म्हणून घेऊ शकता. कर्ज/ओव्हरड्राफ्ट मिळाल्यानंतर अॅन्युइटी पेमेंट रक्कम तुमच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. ठेवीदाराच्या आकस्मिक मृत्यूनंतर ही योजना मुदतीपूर्वी बंद करता येते. याशिवाय 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम मुदत पूर्ण होण्या आधी काढता येते. मात्र प्री-मॅच्युअर पेनल्टी देखील एफडीच्या दराने भरावी लागेल. म्हणजेच जर तुम्ही योजना कालावधी पूर्ण होण्या आधी पैसे काढले तर तुम्हाला प्री-मॅच्युअर पेनल्टी भरावी लागेल.ब्या योजनेत गुंतवणूक खाते, एकल किंवा संयुक्त अशा दोन्ही प्रकारे उघडता येते.

वार्षिक परतावा

SBI च्या या योजनेत, ठेवीच्या पुढील महिन्यातील देय तारखेपासून वार्षिक परतावा दिला जाईल. SBI अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर ज्या व्याजदराने परतावा मिळतो, त्याच दराने परतावा दिला जातो. या योजनेमध्ये वैयक्तिक नामांकन करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यास SBI तर्फे युनिव्हर्सल पासबुक जारी केले जाते. या योजनेचे खाते तुम्ही SBI च्या एका बँक शाखेतून दुसऱ्या शाखेत हलवू शकता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Annuity Deposit Scheme interest rates on 28 May 2023.

हॅशटॅग्स

SBI investment Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x