1 May 2025 10:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट | बँकेच्या 'या' 7 सेवांपासून राहवं लागणार वंचित

SBI Online

मुंबई, ०४ सप्टेंबर | एसबीआयने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. आता भारतीय स्टेट बॅंकेच्या 4 ते 5 सप्टेंबर काही तासांसाठी इंटरनेट बॅंकिंगसह (Internet Banking) 7 प्रकारच्या सेवा बंद करण्यात येणार आहेत. बॅंकेकडून या सेवा तात्पुरत्या काळासाठी विस्कळीत होतील असे सांगण्यात आले होते. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, 4 ते 5 सप्टेंबरच्या रात्री देखभाल उपक्रमांसाठी या सेवा तीन तासांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात एसबीआय ग्राहक बॅंकिंग सेवा वापरता येणार नाहीत. एसबीआयने ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट, बँकेच्या ‘या’ 7 सेवांपासून राहवं लागणार वंचित – SBI bank customers will not be able to use 7 types of services including internet banking :

दरम्यान, देखभाल 4 सप्टेंबर रोजी 22.35 ते 5 सप्टेंबर रोजी दुपारी 01.35 पर्यंत सुरु राहतील. या काळामधये इंटरनेट बॅंकिंग, YONO, YONO लाईट, YONO बिझनेस आणि IMPS आणि UPI सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार नाहीत, असही एसबीआयकडून कळविण्यात आले आहे. तसेच एसबीआयने आपल्या सोशल मिडियावरील ट्वीटरद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे. वेळोवेळी आपल्या डिजिटल बॅंकिग प्लॅटफॉर्मचं मेंटेनस एसबीआय करते. मागील महिन्यामध्ये देखभालीच्या कामांमुळे भारतीय स्टेट बॅंकेच्या सेवाही काही काळासाठी विस्कळीत झाल्या होत्या.

शिवाय, डिजिटल ग्राहकांना या काळामध्ये योनो, योनो लाईट, इंटरनेट बॅंकिग, युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या सेवांचा लाभ मिळू शकत नाही. प्रत्येक वेळी बॅंकेकडून ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात येते. एसबीआय YONOत सध्या 3.5 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहक असल्याने एसबीआय रात्रीच्या वेळी देखभालीचे काम करते, जेणेकरुन ग्राहकांना कमीत कमी त्याचा फटका बसू शकेल. एसबीआयचे सध्या यूपीआय वापरकर्त्यांची संख्या 13.5 कोटींपेक्षा जास्त आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: SBI bank customers will not be able to use 7 types of services including internet banking.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या