
SBI Bank Scheme | देशातील सर्वांत नावाजलेली बँक म्हणजेच एसबीआय बँक. एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत जबरदस्त योजना आणली आहे. एसबीआयच्या नव्या योजनेचे नाव (SBI हर घर लखपती) असं आहे. ज्या व्यक्तींना दीर्घकाळ्यात मोठा खंड तयार करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायद्याची ठरू शकणार आहे. आज या बातमीपत्रातून आपण योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही आत्तापर्यंत RD योजनेविषयी बऱ्याच वेळा ऐकलं असेल. आरडी म्हणजेच रीकरिंग डिपॉझिट. यामध्ये तुम्हाला कमीत कमी रक्कम गुंतवून मोठा फंडा तयार करता येतो. यामध्ये तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीतून देखील मोठा फंडा तयार करू शकता.
योजनेसाठी कोण आहे पात्र :
SBI च्या हर घर लखपती या योजनेमध्ये अगदी 10 वर्ष असलेल्या लहान मुलाचे देखील खाते उघडता येऊ शकते तर, सीनियर सिटीजन म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे खाते देखील उघडता येऊ शकते. हर घर लखपती या योजनेचे उद्दिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरातील व्यक्तला लखपती बनण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या योजनेला सुरुवात केली गेली आहे. तुम्ही या योजनेमध्ये 3 ते 10 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.
प्रत्येक दिवसाला गुंतवा 80 रुपये :
कमीत कमी म्हणजेच केवळ 80 रुपये गुंतवून देखील तुम्ही लाखोंचा फंड तयार करू शकता. समजा तुम्ही प्रत्येक दिवसाला 80 रुपये वाचवत असाल तर, महिन्याला 2500 रुपये जमा होतील. प्रत्येक महिन्याला 2500 रुपये गुंतवल्यानंतर 3 वर्षांतच 1 लाख रुपयांची रक्कम जमा होईल.
योजनेचे व्याजदर देखील जाणून घ्या :
एसबीआयच्या या नवीन योजनेच्या व्याजदरविषयी जाणून घ्यायचे झाले तर, यामध्ये वेगवेगळ्या मॅच्युरिटी पिरियडनुसार वेगवेगळी व्याजदरे पाहायला मिळतात. दरम्यान सामान्य नागरिकांसाठी 6.75 तर सीनियर सिटीजन व्यक्तींसाठी 7.25% व्याजदर दिले आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसबीआय बँकेतील कर्मचाऱ्याने योजनेमध्ये पैसे गुंतवले तर, त्याला 8% दराने व्याजदर मिळते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.