
SBI Car Loan | सध्या मार्केटमध्ये नवनवीन मॉडेल्स आणि जबरदस्त फीचर्स असलेल्या महागड्या गाड्या उपलब्ध आहेत. अशातच प्रत्येक व्यक्तीला आपल्या दारात देखील ऑडी, बीएमडब्ल्यू, फॉर्च्यून यांसारख्या मोठमोठ्या महागड्या गाड्या उभ्या असाव्या असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. परंतु गाड्यांच्या किंमती लाखोंच्या घरात आहेत.
प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला महागड्या गाड्यांच्या किंमती परवडत नाहीत. अशावेळी काहीजण कर्ज घेऊन गाडी घेण्याचा प्रयत्न करतात. समजा कार खरेदी करण्यासाठी तुम्ही बँकेकडून 5 वर्षांच्या कार्यकाळात 8 लाख रुपयांचे कार लोन घेत असाल तर, तुम्हाला किती रुपयांचा ईएमआय हप्ता भरावा लागेल. जाणून घेऊया.
SBI बँकेतून मिळेल कार लोन :
स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक भारताची सर्वात मोठी आणि प्रथम क्रमांकावरची बँक आहे. या बँकेत बहुतांश व्यक्तींचे खाते आहे. लोन घेण्यासाठी एसबीआय बँक फायदेशीर ठरते. कारण की एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना चांगल्या व्याजदर असे कर्ज प्राप्त करून देते. सध्या एसबीआयचे कार लोनचे दर 9.20% सुरू आहे.
8 लाखांच्या कर्जावर मासिक EMI कितीचा भरावा लागेल :
तुम्ही आतापर्यंत ही गोष्ट बऱ्याचदा नोटीस केली असेल. सर्वसामान्य प्रवर्गातील कुटुंबीय 8 लाख रुपयांपर्यंत कार खरेदी करण्यास झेप घेतात. समजा तुम्ही 8 लाख रुपयांचे कार लोन घेत असाल तर, 5 वर्षांच्या कार्यकाळात तुम्हाला प्रत्येक महिन्याला 16,684 रुपयांचा EMI भरावा लागू शकतो.
व्याजदराची रक्कम देखील पहा :
समजा तुम्ही 5 वर्षांसाठी 8 लाख रुपयांचे कार लोन खरेदी करताय तर, 5 वर्षांच्या कार्यकाळानंतर तुम्हाला 10,01,067 एवढे पैसे बँकेला परत करावे लागतील. यामधील व्याजाची रक्कम 2,01,067 एवढी असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.