14 December 2024 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

SBI Card Festival Offer | एसबीआय कार्डने शॉपिंगवर 22.5% पर्यंत कॅशबॅक, खास फेस्टिव ऑफरची संपूर्ण माहिती

SBI Card Festival Offer

SBI Card Festival Offer | जर तुम्ही एसबीआय कार्ड वापरकर्ता असाल आणि या फेस्टिव्ह सीजनमध्ये शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर शॉपिंग करण्यापूर्वी तुम्हाला बँकेकडून देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती एकदा घ्यायला हवी. कारण एसबीआय कार्डवर दिल्या जाणाऱ्या कॅशबॅकसह इतर ऑफर्सचा फायदा घेण्यास तुम्ही चुकता असे होऊ नये.

मोठ्या प्रमाणात कॅशबॅक ऑफर :
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात खरेदीवर मोठ्या प्रमाणात कॅशबॅक ऑफर दिल्या आहेत. म्हणजेच एसबीआय कार्डच्या माध्यमातून शॉपिंगवर डिस्काउंटसह ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर एसबीआयकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही शॉपिंगवर देण्यात येत आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत चालणार ऑफर :
एसबीआयच्या या कॅशबॅक ऑफरचा फायदा ग्राहक 31 ऑक्टोबरपर्यंत घेऊ शकतात. तुम्हालाही शॉपिंगवर कॅशबॅक मिळवायचा असेल तर विनाविलंब तुमची शॉपिंग लिस्ट तयार करा. एसबीआयच्या या ऑफर्समध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स, मोबाइल, फॅशन, लाइफस्टाइल, ज्वेलरी, ट्रॅव्हल आणि ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईटवरून खरेदीवर कॅशबॅक मिळू शकतो. देशातील सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये या ऑफर्स दिल्या जात आहेत. यासाठी एसबीआयने शहरांची टियर 1, टियर 2 आणि टियर 3 कॅटेगरीमध्ये विभागणी केली आहे.

खरेदीवर 22.5% पर्यंत कॅशबॅक :
देशभरातील अडीच हजारहून अधिक शहरांमध्ये ७० राष्ट्रीय आणि १५५० प्रादेशिक तसेच हायपरलोकल ऑफर्स देण्यात येत आहेत. या फेस्टिव ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना एसबीआयच्या वेगवेगळ्या पार्टनर ब्रँडच्या खरेदीवर 22.5% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. एसबीआयने अॅमेझॉन इंडियन फेस्टिव्हल सेलसाठी ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनसोबत भागीदारी केली आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत चालणारा हा या वर्षातील सर्वात मोठा ऑनलाइन सेल इव्हेंट आहे. यासोबतच एसबीआयने फ्लिपकार्ट, सॅमसंग मोबाईल, रिलायन्स ट्रेंड्स, पॅन्टालून, रेमंड्स, एलजी, सॅमसंग, सोनी, एचपी, मेक माय ट्रिप, गोइबिबो, विशाल मेगामार्ट, रिलायन्स ज्वेल्स, कॅरेटलेन, हीरो मोटर्स अशा 20 हून अधिक ब्रँडसोबत भागीदारी केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Card Festival Offer details need to know here 27 September 2022.

हॅशटॅग्स

#SBI Card Festival Offer(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x