30 November 2023 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय? OK Play Share Price | मल्टिबॅगर शेअर! ओके प्ले इंडिया शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील सेव्ह करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पगारात होणार मोठी वाढ, आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाचे अपडेट BHEL Share Price | सरकारी कंपनीचा भरवशाचा शेअर! भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर्स अप्पर सर्किटवर, फायदा घेणार?
x

SBI Share Price | मार्ग श्रीमंतीचा! SBI बँक FD की SBI शेअर्स? फायदा कुठे? होय! SBI बँक शेअर्स 20% परतावा देतील, फायदा घेणार का?

SBI Share Price

SBI Share Price | स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI बँकेच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहे. पुढील काळात SBI बँकेचे शेअर्स 700 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 1.36 टक्क्यांच्या वाढीसह 596.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या बँकिंग स्टॉकवर तज्ज्ञांनी तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे.

तज्ज्ञांचा SBI बँक शेअर खरेदी करण्याचा सल्ला

शेअर बाजारातील एकूण 40 तज्ञांपैकी 23 जणांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर तीन तज्ज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी SBI बँकेचे शेअर्स 0.17 टक्के वाढीसह 598.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची टार्गेट प्राईस

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने 11 सप्टेंबर 2023 एक अहवाल प्रसिद्ध करून स्टेट बँकेच्या शेअरवर 700 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 17.36 टक्के अधिक आहे. HDFC सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात SBI बँकेच्या शेअरसाठी 750 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 25 टक्के अधिक आहे. SBI बँकेच्या स्टॉकवर तज्ञांनी सरासरी लक्ष्य किंमत 711.20 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान सरासरी 20 टक्के परतावा मिळू शकतो.

लाभांश तपशील

SBI बँकेने मे 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 1130 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 2022 मध्ये देखील SBI बँकेने 710 टक्के लाभांश वाटप करण्याची बातमी देऊन गुंतवणूकदारांना खूश केले होते. याशिवाय बँकेच्या लाभांश वाटप करण्याचा इतिहास खूप शानदार राहिलेला आहे.

मे 2021 मध्ये या बँकेने लोकांना 400 टक्के, मे 2017 मध्ये 260 टक्के, 2016 मध्ये 60 टक्के लाभांश वाटप केला होता. एवढा परतावा तर बँक एफडी सारख्या गुंतवणुकीवर देखील देत नाही. जेवढे पैसे तुम्ही एफडी मध्ये जमा करता, त्यापेक्षा जास्त परतावा तर बँक लाभांश म्हणून गुंतवणूकदारांना वाटप करते.

याशिवाय परकीय गुंतवणूकदारांनी देखील एसबीआयच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मार्च 2023 मध्ये 9.89 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर जून तिमाहीत त्यांच्या गुंतवणूकीचा वाटा 10.36 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. म्युच्युअल फंडांनी मात्र आपला वाटा 25.17 टक्केवरून कमीकरून 24.80 टक्केपर्यंत कमी केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Share Price today on 15 September 2023.

हॅशटॅग्स

#SBI Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x