19 May 2024 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
x

Suzlon Share Price | बापरे! सुझलॉन एनर्जी शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, शेअर श्रीमंत करणार? फायद्याची सविस्तर बातमी

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. भारतातील दिग्गज म्युच्युअल फंडांनी देखील सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड पैसे गुंतवले आहेत.

म्युच्युअल फंडांनी ऑगस्ट 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे 50 कोटी पेक्षा जास्त खरेदी करून गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडांनी सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये आपली गुंतवणूक मासिक आधारावर 357 टक्के पेक्षा जास्त वाढवली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 23.31 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कंपनीने सेबीला दिलेल्या लेटेस्ट डेटानुसार सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये म्युच्युअल फंडांनी 64 कोटींपेक्षा जास्त शेअर्स होल्ड केले आहेत. जुलै 2023 मध्ये म्युच्युअल फंडांकडे सुझलॉन एनर्जी कंपनीचे 14.09 कोटी शेअर्स होते. ऑगस्ट 2023 च्या अखेरी पर्यंत भारतातील 64 म्युच्युअल फंडांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये सुझलॉन एनर्जीचे शेअर्स होल्ड केले होते. याचे एकत्रित बाजार मूल्य 1567 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.01 टक्के वाढीसह 23.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

28 मार्च 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.08 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 14 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.31 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अवघ्या सहा महिन्यात या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या वर्षी आतापर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 118 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 27 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.60 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 15 September 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x