
SBI Special FD Scheme | एफबीआय ‘म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया’ ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा आणि योजना देखील घेऊन येत असते. ज्या व्यक्तींना पुढील 2 वर्षांत आपले पैसे दुप्पटीने वाढवायचे असतील त्यांच्यासाठी एसबीआयची एक ‘स्पेशल एफडी योजना’ अत्यंत फायदेशीर ठरू शकते. महत्त्वाचं म्हणजे एसबीआयची ही स्पेशल एफडी योजना आपल्या ग्राहकांना पोस्टाच्या योजनांपेक्षा आणि पीपीएफ योजनेपेक्षा जास्तीचे व्याजदर प्रदान करत आहे.
ही योजना कमी वेळात सर्वाधिक परतावा मिळवणाऱ्या व्यक्तींसाठी प्लॅन केली आहे. एसबीआयच्या स्पेशल एफडीमधून तुम्ही लवकरात लवकर श्रीमंतीच्या मार्गावर चालू लागाल. केवळ 1 किंवा 2 वर्षांमध्ये गुंतवणूक करून मोठा फंड तयार करण्यास मदत होते. आज आपण या बातमीपत्रातून एसबीआयच्या स्पेशल एफडीच्या व्याजदराविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
एसबीआयच्या स्पेशल एफडीचे व्याजदर पाहून घ्या :
एसबीआयची स्पेशिअल एफडी आपल्या ग्राहकांना 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांसाठी 7.40% तर, ज्येष्ठांसाठी 7.50 टक्क्यांनी व्याजदर देते. त्याचबरोबर एखाद्या गुंतवणूक दराने एसबीआयच्या स्पेशल एफडीमध्ये 2 वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक केली असती तर, ज्येष्ठांना 7.90% तर, सामान्य नागरिकांसाठी 7.40% दराने व्याजदर दिले जात आहे. यामध्ये ज्येष्ठांना जास्त प्रमाणात सुविधा दिली जात आहे.
स्पेशल एफडीतील गुंतवणुकीच्या मर्यादाविषयी जाणून घ्या :
एसबीआयच्या स्पेशल एफडीमध्ये तुम्ही 2 कोटींपर्यंत रक्कम गुंतवू शकता. ही गुंतवणुकीची शेवटची लिमिट आहे. दरम्यान तुम्ही 15 लाखांपर्यंत देखील गुंतवणूक करू शकता. तुम्ही एसबीआयच्या स्पेशल एफडीत 2 वर्षांसाठीच्या कालावधीसाठी 15 लाखांची रक्कम गुंतवली तर, तुम्हाला व्याजासकट 17 लाख 36 हजार 919 रुपये मिळतील. यामधील 2,36,919 रुपये व्याजाचे असतील. महत्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदाराला एसबीआयच्या स्पेशल एफडीतून गुंतवलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम मॅच्युरिटी आधी काढता येणार नाही. जर काढायची असेल तर, बँकेचे ठरलेले शुल्क भरावे लागतील.
महत्त्वाचं :
समजा तुम्हाला एसबीआयच्या बेस्ट स्पेशल एफडीचा फायदा घ्यायचा असेल तर, तुम्ही तुमच्या घराजवळील एसबीआय बँक शाखेत जाऊन अप्लाय करू शकता आणि एसबीआय स्पेशल एफडी योजना सुरू करून घेऊ शकता. सुरक्षित गुंतवणुकीसाठी एसबीआय बँकेच्या सर्वच योजना सर्वसामान्यांसाठी आणि ज्येष्ठांसाठी देखील फायद्याच्या आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.