 
						SEL Manufacturing Company Share Price | एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीचे मल्टीबॅगर स्टॉक क्रॅश झाले आहेत. या कंपनीचे नाव आहे, ‘सेल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’. ‘सेल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 90 टक्के पेक्षा जास्त पडले आहेत. या दरम्यान शेअरची किंमत 1625 रुपयांवरून घसरुन 164.35 रुपयांवर आली आहे. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 161.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (SEL Manufacturing Company Limited)
गुंतवणूकदार झाले कंगाल :
‘सेल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणुकदारांना मजबूत तोटा सहन करावा लागत आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमधे एक लाख रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 10 हजार रुपये झाले आहे. ‘सेल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 168.20 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,237.85 रुपये होती. सध्या या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 557.33 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनी पूर्णपणे कर्जात बुडाली असून मागील वर्षी तिचा व्यापारही अनेक दिवस बंद झाला होता.
कंपनीचे तिमाही निकाल :
‘सेल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत तोटा नोंदवला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीला 45.20 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. एक वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीने 28.30 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स 21.55 टक्के वाढीसह 142.57 कोटी रुपयेवर पोहचला होता. एका वर्षापूर्वी डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स 117.29 कोटी रुपये होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचा EBITDA -10.49 कोटी रुपये होता. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत EBITDA 6.04 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		