13 February 2025 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | महिना 40 हजार पगार असणाऱ्या खाजगी पगारदारांच्या खात्यात 3,46,154 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या 8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार, रक्कम जाणून घ्या Salary Vs Savings Account | 90% लोकांना माहिती नाही सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधील फरक, व्याजदर ते मिनिमम बॅलन्स अटी पहा Tax Exemption on HRA | पगारदारांनो, तुमचा HRA वर टॅक्स सवलत मिळणार का, कसा फायदा होईल समजून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या Gratuity Money Alert | खाजगी पगारदारांसाठी 25 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी वाढली, तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल इथे पहा
x

Senco Gold Share Price | सोनं नव्हे! हा सोनं बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक रेटिंग अपग्रेड

Senco Gold Share Price

Senco Gold Share Price | सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील 3 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन दिवसात सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( सेन्को गोल्ड कंपनी अंश )

मागील 12 महिन्यांत सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअर्सची किंमत 178 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी सेन्को गोल्ड स्टॉक 1.25 टक्के वाढीसह 1,113 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जून तिमाहीत सेन्को गोल्ड कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 7.5 टक्क्यांनी वाढून 1403.89 कोटी रुपये नोंदवला आहे. सेन्को गोल्ड कंपनीच्या किरकोळ विक्रीत 9.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल ते जून 2024 या तिमाही काळात सेन्को गोल्ड कंपनीचा निव्वळ नफा 51.27 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. याचा अर्थ कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 85.30 टक्क्यांची वाढ झाली आहे.

एप्रिल ते जून 2024 या तिमाही कालावधीत सेन्को गोल्ड कंपनीने 6 नवीन स्टोअर्स लाँच केली आहेत. सध्या या कंपनीच्या स्टोअर्सची एकूण संख्या 165 वर पोहचली आहे. चालू आर्थिक वर्षात सेन्को गोल्ड कंपनीने संपूर्ण देशात 18 ते 20 स्टोअर्स उघडण्याची योजना आखली आहे. एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिस फर्मच्या तज्ञांच्या मते, सेन्को गोल्ड स्टॉक 1400 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने सेन्को गोल्ड स्टॉकवर 1350 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

News Title | Senco Gold Share Price NSE Live 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Senco Gold Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x